Home Breaking News ‘१५०० रुपये घेणा-या महिलांवर पाळत ठेवण्याचे आदेश ‘ विजय वडेट्टीवार

‘१५०० रुपये घेणा-या महिलांवर पाळत ठेवण्याचे आदेश ‘ विजय वडेट्टीवार

30
0

पुणे दिनांक १० नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दरम्यान महायुतीचे सरकारने राज्यातील सर्व महिलांना प्रति महिना १५०० रुपये आपल्या योजनेचे घेणा-या महिला ह्या काॅग्रेस पक्षाच्या रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या.असे वक्तव्य कोल्हापूर येथील भारतीय जनता पार्टीचे खासदार धनंजय महाडिक यांनी केले होते.यावरुन आता राज्यात चांगलाच वाद पेटला आहे.यावर काॅग्रेस पक्षाचे नेते व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे.ते म्हणाले की लाडकी बहीण योजनेचे १ हजार ५०० रुपये घेणा-या महिलांवर पाळत ठेवणेचे भारतीय जनता पार्टीचे आदेश ! सत्तेची मस्ती भारतीय जनता पार्टी वाल्यांच्या डोक्यात किती चढली आहे.हे महाराष्ट्र बघतोय,असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Previous articleभाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी मागितली लाडक्या बहिणींची माफी
Next articleधनंजय महाडिकांचे महिलांवर केलेले वक्तव्य संतापजनक – खासदार सुप्रिया सुळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here