पुणे दिनांक ११ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच राजकीय वर्तुळातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून.मला खासदार होऊन दिल्लीला जाऊ द्यायचं नव्हतं म्हणून मला आमदार केलं, दरम्यान लोकसभा निवडणुक लढवून मला खासदार व्हायचं होतं पण मी खासदार न होता झाले विधान परिषदेचे आमदार झाले.असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपल्याच पक्षाला एक प्रकारे घरचा आहेर दिला आहे.दरम्यान पंकजा मुंडे ह्या बीड मध्ये महायुतीच्या प्रचारा दरम्यान बोलत होत्या.दरम्यान ऐन विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत पंकजा मुंडे यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केल्याने त्या अजून देखील नाराज आहेत.अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.तसेच प्रचार सभेत बोलताना नेमका त्यांचा रोख कुणाकडे आहे? या बाबत देखील आता तर्क लावले जात आहेत.