Home Breaking News ‘ठाकरेंचा बाण गेला आता फक्त उरले खान ‘ राज ठाकरे

‘ठाकरेंचा बाण गेला आता फक्त उरले खान ‘ राज ठाकरे

56
0

पुणे दिनांक १२ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.उध्दव ठाकरे यांच्यावर त्यांचे चूलत बंधू व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चांगलीच तोफ डागली आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही निवडणूक चिन्हासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहे.त्यामुळे आज उध्दव ठाकरेंचा बाण निघून गेला आहे.आता फक्त खान उरले आहेत.असे टिकास्त्र राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर डागले आहे.  दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दिंडोशी विधानसभा मतदारसंघात बोलत होते. दरम्यान राज ठाकरे हे बोलताना पुढे म्हणाले की. वर्सोव्यामध्ये उध्वव ठाकरे यांनी हारुन खानला उमेदवारी दिली आहे.मात्र ज्यांच्या नावातच हारुन आहे ते विधानसभा निवडणुकीत विजयी कसे होतील? असा हल्लाबोल देखील यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.

Previous articleविठ्ठलाची शासकीय महापूजा विभागीय आयुक्त डॉ.पुलकुंडवार यांच्या हस्ते संपन्न
Next articleहिंगोलीत भाजप नेत्यांच्या सभेत सोयाबीन दरवाढ वरुन शेतकऱ्यांचा गोंधळ, सोयाबीनचा फटका भाजपला बसणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here