पुणे दिनांक १२ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच राजकीय वर्तुळातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून.उध्दव ठाकरे हे नेहमीच मुस्लिमांची बाजू घेतात असा आरोप महायुती चे नेतेमंडळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारात घेत आहेत.तसेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेच्या कॅलेंडरमध्ये त्यांच्या नावापुढे जनाब बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.तसेच उध्वव ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे यांनी देखील शिवसेनाचा बाण गेला आता फक्त त्यांच्याकडे खान आहे.अशी टीका केली होती. होती.यावर उध्वव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे मशिदीतील फोटो आपण दाखवू? अशी जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे.तसेच तुमच्या भारतीय जनता पार्टीतून सर्वच मुसलमान काढून टाका.या देशात मुसलमान राहता कामा नये.असे जाहीर करा.असे उध्वव ठाकरे यांनी म्हटले आहे.