पुणे दिनांक १२ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच राजकीय वर्तुळातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी येवल्याच्या एका सभेतून छगन भुजबळ यांच्यावर चांगलीच घणाघाती टीका केली आहे.छगन भुजबळ हे अजित पवार यांची समजूत काढायला जातो म्हणून गेले आणि परत आलेच नाही, फसवेगिरीच्या सर्वच मर्यादा छगन भुजबळ यांनी ओलांडल्या त्या शिल्लक ठेवल्या नाहीत,अशी टीका पवारांनी केली आहे.छगन भुजबळ यांना आमदार केले.विरोधी पक्षनेते केले.गृहमंत्री.तसेच उपमुख्यमंत्री केले.तरी देखील त्यांनी धोका दिला. आता माणिकराव शिंदे यांना विजयी करा.असे आवाहन जेष्ठ नेते शरद पवार यांनी येवल्याच्या जनतेला केले आहे.