पुणे दिनांक १२ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच राजकीय वर्तुळातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू तसेच मोठ्या नेत्यांच्या सभा देखील होत आहेत.दरम्यान हिंगोलीत भारतीय जनता पार्टीचे नेते पाशा पटेल यांच्या सभेत शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस दरवाढीच्या मुद्द्यावरून गोंधळ घातला.आता यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुतीच्या सरकारवर टीका केली आहे.’ पाशा पटेल यांनी सन २०१३ मध्ये काढलेल्या शेतकरी दिंडीत फडणवीस यांनी सोयाबीन ला ६ हजार रुपये भाव देण्याची मागणी केली होती. आता देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपमुख्यमंत्री आहेत. व त्यांचेच सरकार सत्तेवर आहे.व पाशा पटेल हे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत.आज राज्यात शेतकरी वर्गाच्या सोयाबीनला भाव किती मिळत आहे? असा सवालच जयंत पाटील यांनी केला आहे.