पुणे दिनांक १२ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे शहराच्या दौऱ्यावर येत आहेत.पुण्यातील टिळक रोडवरील स. पा.महाविद्यालयाच्या मैदानावर मोदी यांची पुण्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या साठी प्रचार सभा होणार आहे.त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.तसेच मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहे.दरम्यान पुणे शहरात येणाऱ्या प्रवाशांनी आणि नागरिकांनी या मार्गावरील माहिती घेऊन पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन पुणे वाहतूक शाखेचे पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान हे आज पुण्यातील मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहेत.ना.सी.फडके चौक ते नाथ पै चौक दरम्यान वाहनांना प्रवेश बंदी घातली आहे.तसेच बाबू राव घुले पथवरुन आंबिल ओढा जंक्शनकडे प्रवेश बंदी असणार आहे.टिळक रस्ता जंक्शन ते नीलायम पुलाप्रर्यंत नो-पार्किंग .केळकर रस्ता -टिळक चौक ते भिडे पुल एकेरी मार्ग.तसेच गरुड गणपती चौक ते भिडे पूल जंक्शन प्रवेशबंदी.डेक्कनकडून भिडे पूल मार्गे येणाऱ्या वाहनांना केळकर रस्त्याकडे प्रवेशबंदी तसेच पुणे शहरात आज जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.