पुणे दिनांक १२ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज मंगळवार दिनांक १२ नोव्हेंबर कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपूर मध्ये विठ्ठलाची शासकीय महापूजा विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते आज पहाटे संपन्न झाली आहे.तर यावेळी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील बाबूराव सगर व त्यांच्या पत्नी सागराबाई सगर मानाचे वारकरी ठरले आहेत.दरम्यान सगर दाम्पत्य गवंडी काम काम करुन आपला उदरनिर्वाह चालवत आहे.ते दोघेही पती पत्नी मागील १४ वर्षांपासून दर वर्षी कार्तिकी वारी करीत आहेत.
दरम्यान आज कार्तिकी एकादशी यात्रा निमित्ताने विठ्ठल -रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.मंदीर सजावटीसाठी ३० प्रकारच्या विविधरंगी व सुगंधी फुलांचा वापर करण्यात आला आहे.फुले व पाने वापरुन संत नामदेव पायरी सह महाद्वार.विठ्ठल सभामंडप तसेच रुक्मिणी सभा मंडप परिवार देवता व सेल्फी पाॅइंट देखील साकारण्यात आला आहे.दरम्यान आज पंढरपूरात राज्यातील लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले आहेत.काल रात्री पासूनच वारकरी यांनी दर्शना साठी गर्दी केली आहे.आज पहाटे पासून विठ्ठलाचे दर्शन वारकरी घेत आहेत.