पुणे दिनांक १२ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आता सर्वत्र प्रचार जोरात सुरू आहे.दरम्यान हिंगोलीत भारतीय जनता पार्टीचे नेते पाशा पटेल यांच्या सभेत मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला आहे. दरम्यान सोयाबीन व कापसाच्या दरवाढीच्या मुद्द्यावरून शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.पाशा पटेल यांच्या सभेतील गोंधळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.दरम्यान मागील लोकसभा निवडणुकीत कांद्यावर केंद्र सरकारच्या वतीने निर्यातबंदी लादली होती.त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले होते.त्यामूळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर नाराज झाल्याने महायुतीच्या डोळ्यात कांद्यानं पाणी आणलं होतं.त्यामुळे कांदा निर्यातीचा फटका लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारला बसला होता.आता त्यानंतर आता सोयाबीन व कापूस दरवाढीच्या मुद्द्यावरून देखील महायुतीला विधान सभा निवडणुकीत बसण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे.