Home Breaking News मध्यरात्री मालगाडीचे ११ डब्बे रुळावरून घसरले,३७ रेल्वे गाड्या रद्द

मध्यरात्री मालगाडीचे ११ डब्बे रुळावरून घसरले,३७ रेल्वे गाड्या रद्द

45
0

पुणे दिनांक १३ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक खळबळजनक अपडेट तेलंगणा राज्यातून हाती आली असून.तेलंगणातील पेड्डापल्ली जिल्ह्यात मंगळवारी रात्रीच्या सुमारास मालगाडीचे एकूण ११ डब्बे रुळावरून घसरले आहेत. दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार.तेलंगणा राज्यातील राघवपुरम आणि रामागुंडम स्थानकादरम्यान हा अपघात झाला आहे.दरम्यान या रेल्वेगाडी मध्ये लोखंडी काॅईल घेऊन ही मालगाडी उत्तरप्रदेश मधील गाझियाबाद येथे जात होती.सदर या रेल्वे मालगाडीच्या अपघातानंतर रेल्वेची सेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळित झाली आहे.एकूण ३७ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.तर अन्य रेल्वे गाड्या ह्या अन्य मार्गावरुन वळविण्यात आल्या आहेत.दरम्यान रेल्वे अपघातानंतर रेल्वे प्रशासनाच्या वतीने दुरुस्तीचे काम हे युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.

Previous articleभारत & आफ्रिका आज तिसरा टी -२० सामना आज सेन्च्युरियनच्या मैदानावर
Next articleनागपूरात १ कोटी ३५ लाख रुपयांची रोकड जप्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here