Home Breaking News गरोदर महिलेला रुग्णालयात घेऊन जाणा-या रुग्णवाहिकेचा झाला भंयकर स्फोट

गरोदर महिलेला रुग्णालयात घेऊन जाणा-या रुग्णवाहिकेचा झाला भंयकर स्फोट

38
0

पुणे दिनांक १४ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक जळगाव जिल्ह्यातून खळबळ जनक अपडेट हाती आली असून. जळगाव जिल्ह्या मधील धरणगाव येथून महिलेला रुग्णालयात घेऊन जाणा-या रुग्णवाहिके मधील ऑक्सिजन सिलेंडरचा भंयकर असा स्फोट झाला आहे.दरम्यान सदर घटने बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार रुग्णवाहिकेचा चालक राहूल बाविस्कर हा गियर बदलत असताना अचानकपणे एक आगीची ठिणगी उडाली.त्यामुळे चालकाने सावधानता बाळगत रुग्णवाहिकेतून सर्वांना खाली उतरवले मात्र काही वेळातच रुग्णवाहिकेतील ऑक्सिजनच्या सिलेंडरचा स्फोट झाला.आणि या स्फोटात रुग्णवाहिकेच्या चिंधड्या उडाल्या.दरम्यान या रुग्णवाहिकेतील डॉक्टर व गर्भवती 🤰 महिलेला दुसऱ्या रुग्णवाहिकेतून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान रुग्णवाहिकेच्या चालकाच्या सतर्कतेमुळे सर्वांचे प्राण वाचले आहे.

Previous articleपोटनिवडणुकीत राजस्थानमध्ये जाळपोळ, दगडफेक इंटरनेटसेवा बंद
Next articleविधानसभा निवडणुकीत पडतोय पैशाचा पाऊस, राज्यात आतापर्यंत ५३६ कोटींचे घबाड जप्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here