पुणे दिनांक १४ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून राजस्थान मध्ये पोटनिवडणुकीत देवली – उनियारा मध्ये काॅग्रेस पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार ने एसडीएमला मारहाण केली आहे.त्यामुळे एकच खळबळ उडाली असून अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांचे समर्थक काल रात्री पासूनच मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत.वाहनांची जाळपोळ व तोडफोड केली तसेच पोलिसांवर दगडफेक करण्यात आली आहे.दगडफेकीत १० पेक्षा जास्त पोलिस कर्मचारी हे जखमी झाले आहेत.दरम्यान या घटनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी 👮 अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.या दंगल प्रकरणी एकूण १०० जणांना ताब्यात घेतले आहे.दरम्यान या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
र