पुणे दिनांक १५ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर असून आज त्रिपुरारी अर्थात कार्तिक पौर्णिमा आज आहे. दरम्यान दिवाळी सण झाल्यानंतर पंधरवड्यानी म्हणजेच १५ दिवासांनी ही पोर्णिमा असते.या पोर्णिमे ला देव दिवाळी साजरी मोठ्या उत्साहात साजरी करतात अशी मान्यता आहे.दरम्यान आजच्या कार्तिक पौर्णिमेला भरणी नक्षत्र असून आज सकाळपासून ते रात्री ९.५५ वाजेपर्यंत यांचा मुहूर्त आहे.तर शुभमुहूर्त आणि अभिजीत मुहूर्त सकाळी ११.४४ दुपारी १३.२७ पर्यंत आहे.आजच्या कार्तिकी पौर्णिमेला आज गंगा स्नान करणे पवित्र मानले जाते.दरम्यान आजच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ दुपारी ४.५१ वाजता आहे.