पुणे दिनांक १५ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुणे येथील हडपसर येथील मेन रोडवरील वैभव टाॅकीज येथे असणा-या एका तीन मजली जुन्या इमारतीला अचानकपणे भीषण आग लागली आहे.दरम्यान या आगीची माहिती पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाल्यानंतर तातडीने घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आगीवर नियंत्रण आणले आहे. तसेच इमारतीत अडकलेल्या नागरिकांची सुटका केली आहे.दरम्यान या आगीत कोणतीही प्रकारची जीवीत हानी झालेली नाही.अशी माहिती अधिकृत सूत्रांन द्वारे मिळत आहे.