पुणे दिनांक १५ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.राज्यात सर्वत्र विधानसभेच्या निवडणुकीची मोठ्या प्रमाणावर रणधुमाळी सुरू आहे. तसेच सर्वच ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात ५३६ कोटी ४५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.बेकायदा दारु. पैसे.अमली पदार्थ.सोन्याचे व चांदीचे दागिने.हिरे . सापडले आहेत.इत्यादी वस्तूचा समावेश आहे.दरम्यान राज्यात आचारसंहिता लागू केल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाच्या वतीने काही नियम लागू करण्यात आले आहे.मात्र तरीही राज्यात महिनाभरात आदर्श आचारसंहितांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन करण्यात आले आहे.तसेच एकूण ६ हजार पेक्षा जास्त तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच सगळीकडे नाकाबंदी असताना देखील राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पैशाचा पाऊस पडत आहे.