पुणे दिनांक १५ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता क्रिकेट 🏏 विश्वातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून.आज झालेल्या टी-२० सामन्यात भारताने प्रथम टाॅस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.दरम्यान प्रथम फलंदाजी करताना भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिके समोर २८४ धावांचे आव्हान ठेवले आहे.या सामन्यात अभिषेक शर्माने ३६ धावा केल्या तर संजू सॅमसन यांने ५६ चेंडूत १०९ धावा केल्या तर टिळक वर्माने ४७ चेंडू मध्ये १२० धावा केल्या आहेत.दोघेजणांनी नवाब फलंदाजी केली आहे.दरम्यान संजू सॅमसन हा टी -२०च्या इतिहासात एका वर्षात ३ शतके करणारा पहिला क्रिकेटर ठरला आहे.तसेच संजू सॅमसन आणि टिळक वर्माने दुसऱ्या विकेटसाठी फक्त ८६ चेंडूत २१० धावा जोडल्या दरम्यान दक्षिण आफ्रिकेतील टी -२० मधील भारताची सर्वात मोठी धावसंख्या आहे.