पुणे दिनांक १७ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.विधानसभा निवडणूकीचा पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार.बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार करण्यात आला असून या गोळीबारात दोन जण गंभीर रित्या जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान सदर गोळीबार नेमका कोणत्या कारणांवरून झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.पण सदरच्या गोळीबाराने बीड जिल्हा हादरला आहे.व या भागात एकच दहशतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान बीड-लातूर रोडवरील सेलू आंबा टोल नाक्यावर ही गोळीबाराची घटना घडली आहे. सदरच्या गोळीबारात संदीप तांदळे व अभय पंडित अशी जखमी झालेल्या दोन जणांची नावे आहेत.