पुणे दिनांक १८ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता महाराष्ट्रात सर्वत्र हळू हळू थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे.दरम्यान उत्तर महाराष्ट्र मध्ये सध्या थंडीचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे.दरम्यान नाशिक.धुळे व निफाड शहरातील तापमानात कमालीची घट झाली आहे.तर उर्वरित महाराष्ट्रातही काही दिवसांतच कडाक्याची थंडी पडणार आहे.असे हवामान विभागाच्या वतीने अंदाज वर्तविण्यात येत आहे.आज सोमवारी राज्यात किमान तापमानात २ ते ३ अंशाची घट होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.