Home Breaking News माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भ्याड हल्ल्याचा...

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भ्याड हल्ल्याचा निषेध

79
0

पुणे दिनांक १८ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच राजकीय वर्तुळातून एक खळबळ जनक नागपूर येथून आली असून. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली आहे.दरम्यान आज सायंकाळी पाच वाजता प्रचाराची सांगता करुन ते जात असताना काटोल जलालखेडा मार्गावर बेल फाट्यावर जवळ  सदरची घटना घडली आहे.दरम्यान सूत्रांनद्वारे मिळालेल्या माहितीनुसार देशमुख यांना तातडीने उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाच्या वतीने प्रतिक्रिया देण्यात आली आहे.की सध्या महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेच्या तीन तेरा वाजल्या आहेत.तसेच लोकशाहीचे संपूर्ण महाराष्ट्रात धिंडवडे उडवले जात आहे.याचे आजचे उदाहरण हे ताजे आहे.आज काटोल विधानसभा मतदारसंघात माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आज पाच वाजता प्रचाराची सांगता सभा घेऊन घरी जात असताना देशमुख यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान या भ्याड हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे.तसे एक ट्विट शरद पवार यांच्या गटाच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleगॅंगस्टर लाॅरेन्स बिश्नोईच्या भावाच्या अमेरिकेत आवळल्या मुसक्या
Next articleहितेंद्र ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल, पत्रकार परिषद घेऊ नका,असे कोणत्या कायद्यात आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here