पुणे दिनांक १९ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच राजकीय वर्तुळातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून.भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी विरार विधान सभा मतदारसंघात कोट्यवधी रुपये वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद ठाकूर यांनी केला आहे.त्यानंतर बहुजन विकास आघाडीचे व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांच्यात विरार येथील हाॅटेल विवांतामध्ये मोठ्या प्रमाणावर राडा झाला आहे. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस विनोद तावडे व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राजन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान विवांता हाॅटेलमध्ये भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस विनोद तावडे पैसे वाटप केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद ठाकूर यांनी केला आहे.आता यावर काॅग्रेस पक्षांचे नेते व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान विनोद तावडे यांनी जे काम केलं आहे त्यासाठी त्यांना अटक केली पाहिजे.त्यांच्यावर केस चालवली पाहिजे.तसेच ज्यांनी पैसे वाटले आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे,असे ते म्हणाले आहेत.