पुणे दिनांक १९ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी कोट्यवधी रुपये वाटल्याचा गंभीर आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद ठाकूर यांनी केल्या नंतर मोठ्या प्रमाणावर राडा झाला आहे.व त्यानंतर ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतली.दरम्यान या प्रकरणी हितेंद ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतली म्हणून त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र ज्या नेत्यांनी आरोप केले आता त्याच्या विरोधातच गुन्हा दाखल केल्यानंतर आता विविध राजकीय वर्तुळातून चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.
दरम्यान या प्रकरणी पत्रकार परिषद घेतल्याने बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद ठाकूर यांच्यावर निवडणूक आयोगाच्या वतीने गुन्हा दाखल केल्यानंतर यावर आता हितेंद ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान पत्रकार परिषद घेऊ नका,असे कोणत्या कायद्यात आणि नियमात आहे.मी कुणाच्या बापाचे प्रेशर घेत नाही.दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या वतीने ज्या हाॅटेलमध्ये पैसे वाटप केले.ते हाॅटेलच्या प्रत्येक रुममध्ये वाटले आहे.तसेच अनेक महिला देखील पैसे वाटपात रुम मध्ये सापडल्या आहेत. तसेच भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तसेच भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस विनोद तावडे या हाॅटेल मध्ये कसे काय थांबले? दरम्यान पोलिस यंत्रणा व निवडणूक आयोगावर सत्ताधारी सरकारचा दबाव आहे.असे देखील हितेंद ठाकूर यांनी म्हटले आहे.