Home Breaking News परळीत EVM मशिनची तोडफोड,शरद पवार यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांला बेदम मारहाण

परळीत EVM मशिनची तोडफोड,शरद पवार यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांला बेदम मारहाण

40
0

पुणे दिनांक २० नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.परळीत एका मतदान केंद्रावर EVM मशिनची तोडफोड करण्यात आली असून याच बरोबर मतदान केंद्रातील टेबल व इतर साहित्याचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले आहे.दरम्यान सदर घटनेची पोलिसां  कडून पाहाणी करण्यात आली आहे.तसेच ही तोडफोड कोणी केली याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

दरम्यान परळीत वकिल माधव आप्पा जाधव यांना मतदार संघातील बुथच्या बाहेर विरोधी पक्षांच्या गुंडांनी बेदम मारहाण केली आहे.असा दावा बीडचे खासदार बजरंग सोनवणेंनी व्हिडिओ ट्विट करत केला आहे.दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा दहशत पसरवणाऱ्या वृत्तीचा जाहीर निषेध.दरम्यान परळी विधानसभा मतदारसंघात  सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेत छेडछाड केलेले अनेक व्हिडिओ माध्यमातून प्रसारित होत आहेत.असे देखील बीडचे खासदार बजरंग सोनवणेंनी म्हटले आहे.

Previous articleमतदानाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सर्व केंद्राबाहेर कडक पोलिस बंदोबस्त
Next articleसहा वाजल्यापासून पोलखोलनामावर एक्झिट पोल पहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here