पुणे दिनांक २० नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज महाराष्ट्रात एकूण २८८ विधानसभा मतदारसंघात सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान झाले असून आता महाविकास आघाडी व महायुती यांच्या मध्ये झालेल्या सामना आता माध्यमांवर एक्झिट पोल यायला सुरुवात झाली आहे.दरम्यान इलेक्टोरल एजचा पोल नुसार आकडेवारी महायुती एकूण जागा ११८ भारतीय जनता पार्टी ७८ शिवसेना शिंदे गट २६ अजित पवार गट.१४ .तर पोल डायरीचा एक्झिट पोल नुसार आकडेवारी महायुती भारतीय जनता पार्टी ७७ -१०८ शिंदे गट २७- ५० अजित पवार १८ – २८ तर महाविकास आघाडी काँग्रेस २८-४७ ठाकरे गट १६ – ३५ शरद पवार गट २५ -३९
दरम्यान चाणक्य स्ट्रॅटेजीसचा पोल या प्रमाणे आहे. महायुती १५२- १६० भारतीय जनता पार्टी ९० . शिवसेना ४८ अजित पवार २२ तर महाविकास आघाडी १३०- १३८ काॅग्रेस १३० . ठाकरे गट ३५ शरद पवार गट ४०.तर मॅट्रिझचा एक्झिट पोल नुसार महायुती १५०- १७० भारतीय जनता पार्टी ८९ – १०१ शिंदे गट ३७- ४५ अजित पवार गट १७- २६ तर महाविकास आघाडी ११० – १३० काॅग्रेस ३९ – ४७ शरद पवार गट २१-३९ तर ठाकरे गट ३५-४३ तर पोल्स ऑफ पोल्स डायरीचा एक्झिट पोल नुसार महायुती १४० तर महाविकास आघाडी १३० तर इतर १८ जागा दाखवत आहे.दरम्यान हे सर्व आकडे वारी एक्झिट पोल नुसार अंदाजे आकडेवारी आहे. दिनांक २३ नोव्हेंबरला मतमोजणी होत असून त्यानंतरच महाराष्ट्रात सरकार कोणाचे? हे स्पष्ट होणार आहे.