पुणे दिनांक २० नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक मालाड पूर्व मधून खळबळजनक अपडेट हाती आली असून मुंबईतील मालाड पूर्व येथील पठाण वाडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या गटात प्रचंड प्रमाणावर राडा झाला आहे.अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार संजय निरुपम यांनी उध्दव ठाकरे गटाच्या मुस्लिम कार्यकर्त्यांवर मारहाणीचा गंभीर आरोप केला आहे.दरम्यान या राड्यानंतर संजय निरुपम हे आक्रमक झाले आहेत.व त्यांनी खुर्ची व टेबल फेकल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान उध्दव ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे बळजबरीने मतदारांना मतदान करण्यासाठी नेत होते.असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वतीने यावेळी करण्यात आला आहे.