पुणे दिनांक २१ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच राजकीय वर्तुळातून एक हाती अपडेट आली असून.विधानसभा मतदानानंतर विविध संस्थाचे २८८ विधानसभा जागेचे एक्झिट पोल समोर आले आहेत.या एक्झिट पोल मध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही.तसेच छोटे पक्ष व अपक्ष बंडखोर उमेदवार १५ ते २० निवडून येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.तसेच महाविकास आघाडीला १३० जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.या सर्व पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीच्या वतीने जेष्ठ नेते शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व काॅग्रेस पक्षाचे बाळासाहेब थोरात.हे दोघेजण निवडून येतील अशा बंडखोरांशी संपर्क साधल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.दरम्यान विधानसभा मतमोजणी दिनांक २३ नोव्हेंबर रोजी शनिवारी आहे.त्याचपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे.