पुणे दिनांक २२ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक राजकीय वर्तुळातून अपडेट हाती आली असून. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे.असा दावा जेष्ठ नेते शरद पवार यांनी केला आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.महाविकास आघाडीच्या एकूण १५७ जागा निवडून येणार आहे.असा विश्वास देखील शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान आज शरद पवार गटाची ऑनलाइन बैठक पार पडली आहे. यात शरद पवार यांनी उमेदवारांना काही महत्त्वाच्या सुचना करत विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर प्रमाणपत्र घेऊन थेट मुंबई गाठा.असे म्हटल्याची माहिती आहे.