पुणे दिनांक २२ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राजकीय वर्तुळातून एक अपडेट हाती आली असून.वंचित बहुजन आघाडीला उद्या दिनांक २३ नोव्हेंबर शनिवारी होणा-या मतमोजणीत चांगले आकडे मिळाले तर आम्ही सत्ता स्थापन करणा-यांच्या सोबत राहू.’ हम सत्ता में रहना चुनेंगे ‘, असा आज पुन्हा एकदा असा पुनरुच्चार वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.दरम्यान त्यांनी X हॅंडलवरुन या बाबतची माहिती दिली आहे. दरम्यान यापूर्वी देखील प्रकाश आंबेडकर यांनी ज्याची सत्ता येईल,त्याच्या सोबत जाणार असल्याचे वक्तव्य केले होते.दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवली होती.तसेच नुकतेच जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीत २८८ जागेवर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही असे एकंदरीत एक्झिट पोल मध्ये स्पष्ट झाले आहे.त्यामुळे महाविकास आघाडी व महायुती यांच्याकडून अपक्ष बंडखोर उमेदवार व अन्य पक्षां सोबत आताच संपर्क साधण्याचे काम सुरू झाले आहे. दरम्यान अपक्ष आमदारांना एकंदरीत सुगीचे दिवस येताना आता स्पष्ट झाले आहे.तसेच छोट्या पक्षांना देखील आता म्हत्वं प्राप्त होताना दिसत आहे. जर महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही पक्षांना बहुमत न मिळाल्यास दोन्ही पक्षांकडून सत्ता स्थापन करण्यासाठी अपक्ष बंडखोर उमेदवार व छोट्या पक्षां शिवाय सरकार स्थापन करता येणार नाही.