पुणे दिनांक २४ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच उत्तरप्रदेश मधून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून.उत्तरप्रदेशातील संभलमध्ये शाही जामा मशिदीच्या सर्वेशणादरम्यान मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला आहे.येथे मोठ्या प्रमाणावर जमलेल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली आहे.दरम्यान पोलिसांवर जमावाने दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवण्या साठी लाठीमार केला.तसेच अश्रु धुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.दरम्यान १९ नोव्हेंबरला मशिदीचे सर्वेक्षण केले होते.सदरची मशिद ही हरिहर मंदीर असल्याचा दावा एका पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.अशा स्थितीत आज दोन्ही पक्षांच्या उपस्थितीत पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले.त्या दरम्यान हा सर्व गोंधळ उडाला आहे.
या