पुणे दिनांक २४ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावर झटका बसल्या नंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज कराड येथे पत्रकार परिषदेत प्रथमच या पराभवानंतर आपलं मत मांडलं आहे.योगींच्या ‘ बटेंगे तो कटेंगे ‘ ना-यामुळे मतांचे ध्रुवीकरण झाले.असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.” पुन्हा एकदा नव्या जोमाने कर्तृत्ववान पिढी उभी केली पाहिजे.तसेच अजित पवार व युगेंद्र यांची तुलना होऊ शकत नाही.युगेंद्र हा नवखा तरुण आहे.तसेच अजित पवारांचा विजय मानने यात गैर नाही.मराठा-ओबीसी मतांसंदर्भात अभ्यास करु.विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक संख्याबळ आमच्याकडे नाही”.असे देखील शरद पवार म्हणाले आहेत.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की.विधानसभा निवडणुकीत लोकांनी दिलेला निर्णय अपेक्षित नव्हता .असे भाष्य जेष्ठ नेते शरद पवार यांनी केले आहे. तसेच आम्ही का पडलो.याची कारणे शोधू आणि पुन्हा लोकांमध्ये जाऊन नव्या उमेदीने लढू.ठिक ठिकाणी लाडक्या बहिण योजनेचा फटका बसला.या योजनेद्वारे लोकांच्या खिशात पैसे देण्यात आले.तसेच विरोधक सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करतील असा प्रचार महायुतीने केला.यामुळे आम्हाला कमी मते मिळाली.असे देखील जेष्ठ नेते शरद पवार यांनी कराड येथील पत्रकार परिषदेत म्हटले आहे.