पुणे दिनांक २४ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक राजकीय वर्तुळातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली आहे. राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ चिन्ह यावरील सुनावणी दिनांक २६ नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात पार पडणार आहे.आता विधानसभा निवडणुकीनंतर सुप्रीम कोर्ट यावर अंतिम निकाल देणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी अजित पवार गट सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करत नसल्याचे शरद पवार गट कोर्टात गेला होता.यावर आदेशाच्या पालनाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश कोर्टाने अजित पवारांना दिले होते.