पुणे दिनांक २४ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच राजकीय वर्तुळातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून.नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला विधानसभेला अपेक्षापेक्षा जास्त यश मिळाले आहे.मात्र महायुतीला मिळालेले हे यश संशयास्पद असल्याचे सांगत पुणे येथील जेष्ठ वकिल असीम सरोदे हे न्यायालयात जाणार असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे. दरम्यान एवढं मोठं बहुमत महायुला मिळणं शक्य नाही.हा निकाल संशयास्पद आहे.दरम्यान या विधान सभा निवडणुकीत लाडक्या बहीण योजनेचा प्रभाव कुठेही नव्हता.युतीच्या नेत्यांच्या सभेला कुठे देखील गर्दी नव्हती.मग त्यांना बहुमत कसं मिळालं? असे पुण्यातील वकील असीम सरोदे यांनी म्हटले आहे.