पुणे दिनांक २४ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीतून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आले असून त्यांचा लवकरच शपथविधीचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.यातच नवं सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा अंतरवाली सराटीत सामुहिक आमरण उपोषण करणार.अशी घोषणा मराठा समाजा चे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठा आंदोलनचा मुद्दा महाराष्ट्रात पेटणार आहे.दरम्यान विधानसभेत भारतीय जनता पार्टीला १३२ जागा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ५७ जागा.आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ४१ जागा मिळाल्या आहेत.