पुणे दिनांक २४ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती राजकीय वर्तुळातून एक अपडेट आली असून.महायुतीला मोठ्या प्रमाणावर मिळालेल्या विजयानंतर आता उद्या सोमवारी नवीन सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे.दिनांक २६ नोव्हेंबर रोजी विधानसभेचा कार्यकाळ संपत असून एक दिवस आधीच महायुतीच्या वतीने सरकार स्थापन केले जाणार आहे.दरम्यान आता नवीन सरकार मध्ये मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहेत.दरम्यान महायुती मध्ये मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे.अजित पवार.तसेच देवेंद्र फडणवीस हे दावेदार आहेत.दरम्यान या संदर्भात आज मुंबईत मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.