पुणे दिनांक २५ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार नंदुरबार तळोद्याच्या रांजणी फाट्याजवळ एसटी बसचा अपघात झाला आहे.दरम्यान रोडवर पडलेले खड्डे वाचवण्याच्या नादात बस उलटली.यात काही शालेय विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. दरम्यान सदरची बस ही नंदुरबार -तळोद्यावरुन धनपूरकडे ही एसटी बस जात होती.त्याच दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे.यातील जखमींना तातडीने उपचारासाठी प्रतापपूर आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.दरम्यान या अपघातात सुदैवाने कोणतीही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.