पुणे दिनांक २५ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती अहिल्यानगर जिल्ह्यातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राहुरी येथील पांढरी फुलं गावात गोळीबाराची घटना घडली असून सदरच्या गोळीबारात दोनजण जखमी झाले आहेत.दरम्यान सदर घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार जखमी झालेल्यांची नावे १) भाऊसाहेब नवले २) संजय नवले अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.माजी मंत्री आणि पराभूत उमेदवार प्राजक्ता तनपुरेंच्या कार्यकर्त्यांकडून गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान यातील जखमी नवले हे नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव कर्डिलेंचे समर्थक आहेत.जखमीवर सध्या सुरभी हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.