पुणे दिनांक २६ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक छत्तीसगड येथून अपडेट हाती आली असून मालगाडीचे रॅक उलटल्याची घटना घडली आहे.याघटने बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार.छत्तीसगड येथील भंवरटंक रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे इंजिनसह कोळशाने भरलेले एकूण २३ रॅक हे पटरीवरुन घसरुन मोठी घटना घडली आहे. रेल्वेच्या मोठ्या रॅक मधून कोळसा भरून ही मालगाडी जात असताना रेल्वे इंजिनसह एकूण २३ डब्बे रेल्वे रूळ वरुन घसरले आहेत.दरम्यान या अपघातानंतर कटनी – बिलासपूर रेल्वे मार्गावरील ४ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.तर एकूण ९ गाड्या ह्या इतर मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. दरम्यान या अपघातानंतर रेल्वेच्या प्रशासनाच्या वतीने तातडीने हा लोहमार्ग दुरुस्तीचे काम हाती घेतले असून हे काम पूर्ण होण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे.त्यामुळे या लोहमार्गावरील अनेक रेल्वे ट्रेन रद्द करण्याची शक्यता आहे.