पुणे दिनांक २६ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक नागपूर येथून खळबळ जनक अपडेट हाती आली असून.चार चाकी आलिशान कारच्या चो-या करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा नागपूर पोलिसांनी 👮 पर्दाफाश केला आहे. व चार जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.या चोरी प्रकरणी मुख्य आरोपी हा फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.दरम्यान या आंतरराष्ट्रीय टोळीच्या कडून नागपूर पोलिसांनी तब्बल दीड कोटींचा मुद्देमाल जप्त केला असून तसेच एकूण ११ गाड्या देखील जप्त केल्या आहेत. यातील आरोपी हे एका साॅप्टवेअर च्या सहाय्याने लाॅक खोलायचे आणि गाड्यांची चोरी करायाचे.दरम्यान नागपूर येथे चोरी केलेल्या गाड्यांची ते दिल्ली.हैदराबाद तसेच मणिपूर येथे विक्री करत असत असं पोलिसांच्या तपासात सिद्ध झाले आहे.