पुणे दिनांक २६ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून अपडेट आली असून.मध्यरात्री एक वाजता एक्स पोस्ट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना व कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की.माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे व मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे.तुमच्या या प्रेमा पोटी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे.मात्र अशा पध्दतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये. असे आवाहन मी करतो.राज्यात पुन्हा एकदा आपले महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे.असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.