Home Breaking News एकनाथ शिंदेंना भाजपच्या दोन ऑफर! मुख्यमंत्री पदावरुन महायुतीत तीढा कायम, शिवसेना आमदारांना...

एकनाथ शिंदेंना भाजपच्या दोन ऑफर! मुख्यमंत्री पदावरुन महायुतीत तीढा कायम, शिवसेना आमदारांना मतदार संघात परतण्याचे आदेश

96
0

पुणे दिनांक २६ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला भरघोस बहुमत मिळून देखील मुख्यमंत्री पदावरून मात्र तिढा कायम आहे.दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या वतीने एकनाथ शिंदेंना दोन ऑफर देण्यात आल्या आहेत.अशी माहिती आता खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.दरम्यान यात पहिली ऑफर केंद्रीय मंत्रीमंडळात एकनाथ शिंदेंना मंत्रीमंडळात स्थान दिले जाईल.तर दुसरी उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे.तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्रीपद आपल्याच पक्षाकडे ठेवण्यावर ठाम आहे.दरम्यान महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा तिढा मात्र सुटेना.दरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना त्यांच्या – त्यांच्या मतदारसंघात जाण्यास सांगितले आहे.

दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या वतीने असे म्हणणे आहे की.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुका लढवल्या आहेत.तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी लाडक्या बहिणींची लोकप्रिय अशी योजना त्यांनीच आणली आहे.तसेच त्यांच्या नेतृत्वाखालीच विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड प्रमाणावर बहुमत मिळाले आहे.तसेच लाडक्या बहिणींची देखील मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हेच व्हावे अशी चर्चा आहे.तर शिवसेना शिंदे गटाचे खासदार हे या करिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार आहेत.तसेच शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची पुन्हा एकदा वर्णी लागावी म्हणून शिवसैनिक आग्रही आहेत. त्यांच्या वतीने देवाकडे साकडं घातलं जात आहे.तसेच होम हवन देखील केले जात आहे.तर देवेंद्र फडणवीस यांना देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या गटाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे.तसेच भारतीय जनता पार्टीचे आमदार व अपक्ष आमदार अशा एकूण १७२ आमदारांचा पाठिंबा दिला आहे. तसेच भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांचा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देखील देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देण्यात आला आहे.दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांनी शिंदे यांनाच पाठिंबा द्यावा अशी मागणी केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका लढवल्या आहेत.त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्री करण्यात यावे असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान मुख्यमंत्रीपदी महायुतीत आता चांगलेच घमासान बघायला मिळत आहे.तर मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय नेतृत्वाचे एक शिष्टमंडळ महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांचीच नियुक्ती व्हावी म्हणून शिवसेना शिंदे गटाचे सर्वच आमदार मुंबईत तळ ठोकून आहेत.  तसेच यावरचा पेच सुटत नसल्याने एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या आमदारांना त्यांच्या -त्यांच्या मतदार संघात जाण्यास सांगितले आहे.

Previous articleभारताकडून इस्कॉनचे सचिव दास यांच्या अटकेचा विरोध
Next articleभिवंडीत अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के.नागरिक घाबरून घराबाहेर पळाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here