पुणे दिनांक २६ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.भिवंडी शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य झटके जाणवल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान हे भूकंपचे सौम्य झटके सरवली पाडा.टेमघर पाडा.सोनाळे.भादवड . इत्यादी ठिकाणी २ ते ३ सेंकदांचे कंपन जाणावले आहे.अशी माहिती मिळत आहे.दरम्यान भूकंपाने जमीन हादरली लगेच घाबरून नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. दरम्यान कंपन नेमके कशाचे होते.हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती तहसीलदार अभिजित खोल यांनी दिली आहे. दरम्यान भूकंप झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने महसूल विभागाचे कार्यकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.