पुणे दिनांक २६ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून अपडेट हाती आली असून. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाले आहे.दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी काल सोमवारी रात्री दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली.दरम्यान या बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पहिले अडीच वर्षे व त्यानंतर एकनाथ शिंदे हे अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवतील . तसेच महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री कायम राहणार आहेत.दरम्यान महायुतीमधील प्रत्येक पक्षाला ६ ते ७ आमदारांमागे एक मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.