पुणे दिनांक २६ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथील मुख्यमंत्री यांच्या रामगिरी या निवासस्थानांवरील एकनाथ शिंदे नावाची पाटी आज प्रशासनाच्या वतीने काढण्यात आली आहे.दरम्यान या बाबतची न्यूज प्रसारित होताच प्रशासनाच्या वतीने ही नावाची पाटी परत लावण्यात आली आहे.दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाची मुदत आज संपत आहे.त्यांनी अद्याप आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही.तोपर्यत प्रशासनाच्या वतीने तातडीने रामगिरी बंगल्यावरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी काढली आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.मुख्यमंत्री आज ११ वाजता आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा हा राज्यपाल पीसी राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द करणार आहे.दरम्यान नवीन सरकारचा शपथविधी सोहळा होऊ पर्यंत राज्यपाल हे शिंदे यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सोपवती.आता उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल यांच्या कार्यालयात पोहोचले आहेत.थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील राजभवनाकडे पोहोचतील दरम्यान देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावावर भारतीय जनता पार्टीच्या नावानं शिक्कामोर्तब केले आहे.त्यामुळे आज १४ वी विधानसभा व आज शिंदे सरकार विसर्जित होईल.व नवीन सरकार हे लवकरच स्थापन होणार आहे . सत्ता स्थापनेच्या हालचालीवर घडामोडी सुरू झाल्या आहेत.अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.आज मुख्यमंत्री यांच्या बरोबर काही मंत्र्यांचा देखील शपथ विधी होणार आहे.यात २० जण नवीन मंत्री शपथ घेतील अशी देखील माहिती मिळत आहे.