पुणे दिनांक २६ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून अपडेट आली असून. महाराष्ट्रात एकीकडे महायुतीत मुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार ? यावर रस्सीखेच सुरु असताना तर दुसरीकडे विधानभवन परिसरात विशेष अधिवेशनाची जोरदार तयारी मात्र सुरू झालेली आहे. असे चित्र पाहायला मिळत आहे.दरम्यान या बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसात विशेष अधिवेशन होण्याची शक्यता आहे. दरम्यान महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाची घोषणा अद्याप झालेली नाही.त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वांना मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.