पुणे दिनांक २६ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक न्यूज मनमाड येथून हाती आली असून व-हाड घेऊन जाणा-या एक खासगी कंपनीच्या बसला भीषण अपघात झाला आहे.सदरची अपघाताची घटना ही मनमाड- मालेगाव महामार्गावर चौंडी या गावाजवळ घडली आहे.या अपघातात एकूण ३० ते ४० व-हाडी हे जखमी झाले असून या अपघाता मध्ये कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही. दरम्यान या बस वरील चालकांचे बस वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे.दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच चौंडी गावच्या स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य राबवत बस मधील सर्व व-हाडींना सुखरूप बाहेर काढून त्यांना वाचवले आहे.अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.