Home Breaking News एकनाथ शिंदेंनी भाजपच्या दोन्ही ऑफर नाकरल्या? मुख्यमंत्रीपदाचा दावा कायम

एकनाथ शिंदेंनी भाजपच्या दोन्ही ऑफर नाकरल्या? मुख्यमंत्रीपदाचा दावा कायम

51
0

पुणे दिनांक २७ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच राजकीय वर्तुळातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून.दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडण्यासाठी  भारतीय जनता पार्टीच्या वतीने दोन ऑफर दिल्या होत्या.यात एक म्हणजे केंद्रात मंत्री होण्याबाबत तर दुसरीकडे महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद  अशा दोन ऑफर देण्यात आल्या होत्या.पण एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीच्या दोन्हीही ऑफर फेटाळण्यात आल्या आहेत.तसेच त्यांनी मुख्यमंत्रीपदी पदाचा दावा कायम ठेवला आहे.तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी ठाम आहेत. त्यामुळे आता महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा तिढा हा कायम आहे.असे आता एकंदरीत दिसत आहे. दरम्यान आज देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दरबारी दुपारी जाणार असल्याची देखील सूत्रांकडून माहिती मिळत आहे.तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे आमदार तसेच अपक्ष आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाने यापूर्वीच मुख्यमंत्रीपदा साठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देऊन एकनाथ शिंदे यांना एकप्रकारे कोंडीत पकडले आहे.

Previous article‘मुख्यमंत्रीपदाबाबत एकनाथ शिंदेंना कोणताही शब्द दिलेला नव्हता ‘ रावसाहेब दानवे
Next articleएकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला! मोदींचा निर्णय मान्य असेल -एकनाथ शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here