पुणे दिनांक २७ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून अपडेट आली असून.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला आहे .दरम्यान महायुती मधून भाजपचा जो कोणी उमेदवार मुख्यमंत्रीपदा साठी निवडला जाईल.त्याला आपण पाठिंबा देणार. असे आज बुधवारी शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.आम्ही पुढील पाच वर्षे एकत्र काम करु.त्यांनी मला पाच वर्षे पाठिंबा दिला.आम्ही खुप चांगले काम केले.असे देखील शिंदे यांनी म्हटले आहे.त्यामुळे लवकरच आता महायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होतार आहे.
दरम्यान पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीचे सरकार स्थापनेसंदर्भात घेतलेला कोणताही निर्णय मला मान्य असेल.दरम्यान सरकार स्थापनेत माझा कोणताही प्रकरचा अडथळा होणार नाही.असे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना फोन करून सांगितले आहे.दरम्यान कुठेच काही समस्या नाहीत.महायुतीत सर्व काही आलबेल आहे.असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.