पुणे दिनांक २७ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून अपडेट आली असून.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक २६ नोव्हेंबरला राज्यपाल यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.तर नवीन सरकाराचा शपथविधी सोहळा होऊ पर्यंत एकनाथ शिंदे यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यासाठी राज्यपाल यांनी नेमणूक केली आहे. आता शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत.मात्र महायुतीला मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळून देखील मुख्यमंत्रीपदावरुन तिढा कायम आहे.मात्र सत्ता स्थापन कधीपर्यंत होणार याबाबत बरेच तर्क – वितर्क लावले जात आहे.मात्र भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार व माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा ही ३० नोव्हेंबर रोजी होईल.असे सांगितले आहे.त्यानुसार २ डिसेंबरला शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे. असा एकंदरीत तर्क लावला जात आहे.दरम्यान महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.