पुणे दिनांक २७ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या २८८ आमदारांपैकी तब्बल ६५ % टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.दरम्यान यातील काही आमदारांवर हत्या व अपहरण असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान सदरचा अहवाल असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफाॅर्म्स. महाराष्ट्र इलेक्शन वाॅचने हा अहवाल सादर केला आहे.भारतीय जनता पार्टीचे एकूण १३२ पैकी एकूण ९२ आमदारांवर गुन्हे दाखल आहेत.तर शिवसेना शिंदे गटाच्या एकूण ५७ आमदार पैकी ३८ आमदारांवर गुन्हे दाखल आहेत.तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या एकूण ४१ आमदारांपैकी एकूण २० आमदारांवर गुन्हे दाखल आहेत.तसेच उध्दव ठाकरे गटाच्या २० आमदारांपैकी १३ आमदारांवर गुन्हे दाखल आहेत.तर काॅग्रेस पक्षाच्या एकूण १६ आमदारांपैकी ९ आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या एकूण १० आमदारांपैकी ५ जणांवर गुन्हे दाखल आहेत.अशी खळबळजनक माहिती मिळत आहे.