पुणे दिनांक २७ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच राजकीय वर्तुळातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून.मुख्यमंत्रीपदा बाबत एकनाथ शिंदे यांना कोणत्याही प्रकारचा शब्द दिला नव्हता.असे भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार व मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीच्या प्रचारासाठी जीवाचे रान करणां-या एकनाथ शिंदे यांना आता मोठा राजकीय धक्का बसला आहे.दरम्यान एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री केले जावे.याकरिता शिंदे गटाचे आमदार व माजी मंत्री देखील आग्रही आहेत.मात्र महायुतीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा पदरात पाडून घेऊन देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री बनवणार अशी आता दाट शक्यता निर्माण झाली आहे.त्यांच्या नावावरच केंद्रीय नेतृत्वाने देखील शिक्कामोर्तब केले आहे.असे देखील बोलले जात आहे.त्यांच्या नावाची घोषणा लवकरच अधिकृत घोषणा केव्हाही होऊ शकते.असे अधिकृत सूत्रांनद्वारे माहिती मिळत आहे.