पुणे दिनांक २८ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील आळंदीत आज संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२८ वा संजीवनी समाधी सोहळा पार पडत आहे.या सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी मोठ्या संख्येने आळंदीत दाखल झाले आहेत. दरम्यान इंद्रायणी नदीच्या काठावर लाखो भाविकांची गर्दी झाली असून संपूर्ण इंद्रायणी नदीचा घाट हा वारकरी व भाविक भक्तांनी गजबजून गेला आहे.या संजीवनी सोहळ्याची सुरुवात २३ नोव्हेंबरपासून सुरू झाली असून मुख्य सोहळा आज दुपारी गुरुवारी १२ वाजता सुरू होणार आहे.दरम्यान ७२८ वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर माऊलींनी आजच्याच दिवशी समाधी घेतली होती.